मिरवडी
गावाची माहिती
आपले सहर्ष स्वागत
प्रत्येक पाउल स्वच्छतेकडे , हरीततेकडे व एकूणच सर्वांगीण प्रगतीकडे.
ग्रामपंचायत स्थापना :
सरपंच : श्री.सागर रघुनाथ शेलार (BA.,B.ED) ८८८८०५७२८८
ग्रामसेवक : श्रीम.आर.ए.जाधव (८०८०९४९६९८)
ग्रामपंचायत सदस्यसंख्या : ०९ (सरपंचसह)
लोकसंख्या : २३८०
कुटुंबसंख्या : ४२३
जि.प.प्राथमिक शाळा : ०२ अंगणवाडी : ०३ माध्यमिक शाळा : ०१
वैयक्तिक शौचालय वापरणारी कुटुंब संख्या : ४२३ (१००% )
भूमी
- गावामध्ये २८०० भारतीय प्रजाती (देशी) वृक्षांची लोकसहभागातून वृक्षलागवड व १००% यशस्वीपणे वृक्ष संवर्धन करण्यात आले असून पुढेही सातत्याने सुरु आहे.
- ४०० दुर्मिळ पक्षीउपयोगी देशी वृक्षांची लागवड करून पक्ष्यांचा ज्युसबार हि पक्षी संवर्धनासाठी महत्वकांक्षी प्रकल्प उभारण्यात आला ,तसेच फुलपाखरे यांसाठी उपयुक्त २०० सुंगधीवेली लावल्या.
- हेरीटेज वृक्षांची गणना करण्यात आली ..
- घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प प्रगतीपथावर आहे .
- प्लास्टिकमुक्ती अभियान राबवून ग्रामपंचायत ठराव करून यशस्वीपणे राबवून लोक जनहितार्थ जागृती करून काहीअंशी दंडात्मक कारवाई करून सातत्यपणे सुरु आहे.
- कचऱ्याचे वर्गीकरण साठी csr मार्फत घरोघरी कचरा विलगीकरण साठी सोय करण्यात आली.
- जैवविविधता रजिस्टर / नोंदवही अद्यायवत करून सुरु करण्यात आले.
- इ-कचरा व्यवस्थापन बाबत समाज जागृती करून सुविधा हि उपलब्ध करून देण्यात आली.
- गावात वृक्षलागवड, स्वच्छता अश्या अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या पूर्ततेसाठी जनजागृतपर ग्रामस्थांची प्रभात फेरी , विद्यार्थ्यांची प्रभात फेरी आयोजन करण्यात आले.
- आठवड्यातील दर रविवारी जेष्ठ,युवक,पदाधिकारी,महिला व शाळकरी मुले यांना सोबत घेवून ग्रामस्वच्छता अभियान न चुकता राबविण्यात येते.
- वाढदिवसाला झाडे लावणे , अंत्यविधीची रक्षा विसर्जन न करता ती राख भूमीत टाकून त्यावर वृक्षरोपण , नवजात बाल जन्मानंतर गोड देशी फळझाडांची लागवड, गावात विशेष अतिथी आगमन प्रीत्यर्थ त्यांच्या हस्ते वृक्ष लागवड , जयंत्या विशेष दिन जाणीवपूर्वक वृक्ष लावणे इत्यादी उपक्रम विशेष लोकसहभाग,ग्रामपंचायत, सामाजिक संस्था मार्फत सातत्याने राबविले जातात.
- वरील उपक्रमांमधील अग्रक्रमाने सहभागी असणार्यांना ग्रामपंचायत मार्फत लोकसहभाग उत्साह वाढीसाठी वाढीसाठी वृक्ष-मित्र , पर्यावरण मित्र अशे प्रशस्तिपत्रके देवून गौरविण्यात येते.
वायू
- ग्रामसभेत फटाकाबंदी ठराव करून जनजागृती च्या माध्यमातून प्रदूषणमुक्त गाव यशस्वीपणे राबवले.
- कृषी , घरगुती , व व्यावसायिक कचरा योग्य व्यवस्थापन साठी जाळणे बंद करून नैसर्गिक खत निर्मितीसाठी प्रशिक्षण राबवून वायू प्रदूषण टाळण्यात आले.
- गावातील पर्यावरण पूरक योग्य सवईसाठी सायकल पाथ निर्माण करण्यात आले.
- ग्रामस्थांना इलेक्ट्रिक वाहने खरेदीबाबत जनजागृती करून इ-चार्ज सुविधा उपलब्ध करण्यसाठी अश्वाशित करण्यात आले.
- संपूर्ण कुटुंबाकडे LPG गस उपलब्ध असून इतर कसलेही प्रदूषण होणार नाही या साठी सार्वजनिक शपथ वजवून घेण्यात आली.
जल
- जलस्त्रोतांचे शुद्धीकरणाची प्रक्रिया लोकसहभागातून पूर्ण करण्यात आली.
- जुने पाणवठे , विहिरी , ओढे यांची देखभाल व दुरूस्ती करण्यात आली.
- सांडपाणी व्यवस्थापन साठी बंदिस्त गटार , शासकीय योजनेतून शोषखड्डे , पाणी पुनरवापरासाठी योग्य नियोजन आखले आहे.
- सणांच्या वेळी होणारे जलप्रदूषण टाळण्यासाठी ग्रामपंचायत मार्फत तात्पुरते कृत्रिम तलाव निर्मिती करण्यात येते.
- पर्यावरण पूरक मूर्तींचा वापर होण्यासाठी जनजागृती करण्यात येवून ती ग्रामपंचायत देखरेखेखाली प्रभावी राबविण्यात आली.
- शासकीय इमारती व मालकी इमारतींना रेनवाटर हार्वेस्टिंग करण्याचे नियोजन करून ते नोंदीच्या वेळी तपासले जाईल याची घोषणा करण्यात आली.
- पाणी अडवा पाणी जिरवा हि संकल्पना यशस्वीपणे राबविण्यात आली.
- लोकसहभाग व सामाजिक संस्था यांमार्फत ओढ्या नाल्यातील गाळ काढण्यात आला.
- जास्तीत जास्त शेतकर्यांनी ठिबक , तुषार सिंचन वापरासाठी विशेष जनजागृती कार्यक्रम , मार्गदर्शन मेळावे आयोजित करण्यात आले.
उर्जा
- गावामधील सार्वजनिक रस्ते , ठिकाणे या ठिकाणी १००% LED बल्ब बसविण्यात आले.
- सोलर स्ट्रीट लाइट चा वापर होण्यासाठी जुन्या दुरुस्ती व नवीन निर्मिती करण्यात आल्या आहेत.
- गावामध्ये जनजागृती च्या माध्यामातून अनेक कुटुंबाना सोलर वाटर , सोलर वर शेतीपंप बसविण्यास प्रेरित करून अनेक जन या उपकरणाचा वापर करत आहे.
- बायोगास यंत्रणा साठी जनजागृती द्वारे माहिती देवून शासकीय अनुदानाची माहिती देण्यात आली आहे.
- नैसर्गिक उर्जा स्त्रोत वापरासाठी प्रभात फेरी ,सार्वजनिक ठिकाणी बोलकी चित्र ,संदेश यांची प्रभावी रचना करण्यात आली आहे.
आकाश
- ग्रामसभा , शाळा व इतर सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये ग्रामस्थांनी वैयक्तीक व सामुहिक शपथ घेतली आहे.
- माझी वसुंधरा अभियानाची तत्वे दर्शविण्यासाठी सार्वजनिक जागा , शाळा , रस्ते चौक इत्यादी ठिकाणी रंगरंगोटी करून विशेष संदेश लिहण्यात आले आहेत.
- माझी वसुंधरा अभियान प्रभावी राबविण्यासाठी पर्यावरण दूत ची स्थापना करून अनेक नागरिकांना महत्व पटवून देवून या अभियानात प्रभावी पणे सामील करून घेण्यात आले.
- गावातील शाळेमध्ये चित्रकला , निबंध स्पर्धा , माझ गाव हरित गाव , स्पर्धा घेवून मार्गदर्शनपर कार्यक्रम अयोजीत केले.
- पर्यावरण जनजागृती , सुधारणा व संरक्षण वाढीसाठी सोशल मिडिया च्या # ग्रामपंचायत मिरवडी या पेज ची स्थापना फेसबुक , इंस्ताग्राम , व्हाटसप इत्यादी ठिकाणी नियमित अपडेट करून जन जागृतीसाठी व या उपक्रमामधील लोकसहभाग वाढीसाठी अनेक उपक्रम राबवले.
