माझी वसुंधरा अभियान ग्रामपंचायत मिरवडी

ग्रामपंचायत मिरवडी मार्फत माझी वसुंधरा अभियान सन २०२१-२२ मध्ये मा.गटविकास अधिकारी श्री. अजिंक्य येळे साहेब व श्री.मुलानी साहेब , श्री.ताकवणे साहेब सहा.गटविकास अधिकारी यांचे सखोल मार्गदर्शनानुसार खालीलप्रमाणे प्रभावी उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आले असून पुढेही सातत्यपूर्वकपणे सुरु आहेत …

अ.भूमि-

१) गावामध्ये २८०० भारतीय प्रजाती (देशी) वृक्षांची लोकसहभागातून वृक्षलागवड व १००% यशस्वीपणे वृक्ष संवर्धन करण्यात आले असून पुढेही सातत्याने सुरु आहे.

२) ४०० दुर्मिळ पक्षीउपयोगी देशी वृक्षांची लागवड करून पक्ष्यांचा ज्युसबार हि पक्षी संवर्धनासाठी महत्वकांक्षी प्रकल्प उभारण्यात आला ,तसेच फुलपाखरे यांसाठी उपयुक्त २०० सुंगधीवेली लावल्या.

३) हेरीटेज वृक्षांची गणना करण्यात आली ..

४) घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प प्रगतीपथावर आहे .

५) प्लास्टिकमुक्ती अभियान राबवून ग्रामपंचायत ठराव करून यशस्वीपणे राबवून लोक जनहितार्थ जागृती करून काहीअंशी दंडात्मक कारवाई करून सातत्यपणे सुरु आहे.

६) कचऱ्याचे वर्गीकरण साठी csr मार्फत घरोघरी कचरा विलगीकरण साठी सोय करण्यात आली.

७) जैवविविधता रजिस्टर / नोंदवही अद्यायवत करून सुरु करण्यात आले.

८) इ-कचरा व्यवस्थापन बाबत समाज जागृती करून सुविधा हि उपलब्ध करून देण्यात आली.

९) गावात वृक्षलागवड, स्वच्छता अश्या अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या पूर्ततेसाठी जनजागृतपर ग्रामस्थांची  प्रभात फेरी , विद्यार्थ्यांची प्रभात फेरी आयोजन करण्यात आले.

१०) आठवड्यातील दर रविवारी जेष्ठ,युवक,पदाधिकारी,महिला व शाळकरी मुले यांना सोबत घेवून ग्रामस्वच्छता अभियान न चुकता राबविण्यात येते.

११) वाढदिवसाला झाडे लावणे , अंत्यविधीची रक्षा विसर्जन न करता ती राख भूमीत टाकून त्यावर वृक्षरोपण , नवजात बाल जन्मानंतर गोड देशी फळझाडांची लागवड, गावात विशेष अतिथी आगमन प्रीत्यर्थ त्यांच्या हस्ते वृक्ष लागवड , जयंत्या विशेष दिन जाणीवपूर्वक वृक्ष लावणे इत्यादी उपक्रम विशेष लोकसहभाग,ग्रामपंचायत, सामाजिक संस्था मार्फत सातत्याने राबविले जातात.

१२) वरील उपक्रमांमधील अग्रक्रमाने सहभागी असणार्यांना ग्रामपंचायत मार्फत लोकसहभाग उत्साह वाढीसाठी वाढीसाठी वृक्ष-मित्र , पर्यावरण मित्र अशे प्रशस्तिपत्रके देवून गौरविण्यात येते.

ब. वायू-

१) ग्रामसभेत फटाकाबंदी ठराव करून जनजागृती च्या माध्यमातून प्रदूषणमुक्त गाव यशस्वीपणे राबवले.

२) कृषी , घरगुती , व व्यावसायिक कचरा योग्य व्यवस्थापन साठी जाळणे बंद करून नैसर्गिक खत निर्मितीसाठी प्रशिक्षण राबवून वायू प्रदूषण टाळण्यात आले.

३) गावातील पर्यावरण पूरक योग्य सवईसाठी सायकल पाथ निर्माण करण्यात आले.

४) ग्रामस्थांना इलेक्ट्रिक वाहने खरेदीबाबत जनजागृती करून इ-चार्ज सुविधा उपलब्ध करण्यसाठी अश्वाशित करण्यात आले.

५) संपूर्ण कुटुंबाकडे LPG गस उपलब्ध असून इतर कसलेही प्रदूषण होणार नाही या साठी सार्वजनिक शपथ वजवून घेण्यात आली.

  • जल-
  • जलस्त्रोतांचे शुद्धीकरणाची प्रक्रिया लोकसहभागातून पूर्ण करण्यात आली.
  • जुने पाणवठे , विहिरी , ओढे यांची देखभाल व दुरूस्ती करण्यात आली.
  • सांडपाणी व्यवस्थापन साठी बंदिस्त गटार , शासकीय योजनेतून शोषखड्डे , पाणी पुनरवापरासाठी योग्य नियोजन आखले आहे.
  • सणांच्या वेळी होणारे जलप्रदूषण टाळण्यासाठी ग्रामपंचायत मार्फत तात्पुरते कृत्रिम तलाव निर्मिती करण्यात येते.
  • पर्यावरण पूरक मूर्तींचा वापर होण्यासाठी जनजागृती करण्यात येवून ती ग्रामपंचायत देखरेखेखाली प्रभावी राबविण्यात आली.
  • शासकीय इमारती व मालकी इमारतींना रेनवाटर हार्वेस्टिंग करण्याचे नियोजन करून ते नोंदीच्या वेळी तपासले जाईल याची घोषणा करण्यात आली.
  • पाणी अडवा पाणी जिरवा हि संकल्पना यशस्वीपणे राबविण्यात आली.
  • लोकसहभाग व सामाजिक संस्था यांमार्फत ओढ्या नाल्यातील गाळ काढण्यात आला.
  • जास्तीत जास्त शेतकर्यांनी ठिबक , तुषार सिंचन वापरासाठी विशेष जनजागृती कार्यक्रम , मार्गदर्शन मेळावे आयोजित करण्यात आले.

ड. उर्जा –

१) गावामधील सार्वजनिक रस्ते , ठिकाणे या ठिकाणी १००% LED बल्ब बसविण्यात आले.

२) सोलर स्ट्रीट लाइट चा वापर होण्यासाठी जुन्या दुरुस्ती व नवीन निर्मिती करण्यात आल्या आहेत.

३) गावामध्ये जनजागृती च्या माध्यामातून अनेक कुटुंबाना सोलर वाटर , सोलर वर शेतीपंप बसविण्यास प्रेरित करून अनेक जन या उपकरणाचा वापर करत आहे.

४) बायोगास यंत्रणा साठी जनजागृती द्वारे माहिती देवून शासकीय अनुदानाची माहिती देण्यात आली आहे.

५) नैसर्गिक उर्जा स्त्रोत वापरासाठी प्रभात फेरी ,सार्वजनिक ठिकाणी बोलकी चित्र ,संदेश यांची प्रभावी रचना करण्यात आली आहे.

इ. आकाश –

१) ग्रामसभा , शाळा व इतर सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये ग्रामस्थांनी वैयक्तीक व सामुहिक शपथ घेतली आहे.

२) माझी वसुंधरा अभियानाची तत्वे दर्शविण्यासाठी सार्वजनिक जागा , शाळा , रस्ते चौक इत्यादी ठिकाणी रंगरंगोटी करून विशेष संदेश लिहण्यात आले आहेत.

३) माझी वसुंधरा अभियान प्रभावी राबविण्यासाठी पर्यावरण दूत ची स्थापना करून अनेक नागरिकांना महत्व पटवून देवून या अभियानात प्रभावी पणे सामील करून घेण्यात आले.

४) गावातील शाळेमध्ये चित्रकला , निबंध स्पर्धा , माझ गाव हरित गाव , स्पर्धा घेवून मार्गदर्शनपर कार्यक्रम अयोजीत केले.

५) पर्यावरण जनजागृती , सुधारणा व संरक्षण वाढीसाठी सोशल मिडिया च्या # ग्रामपंचायत मिरवडी या पेज ची स्थापना फेसबुक , इंस्ताग्राम , व्हाटसप इत्यादी ठिकाणी नियमित अपडेट करून जन जागृतीसाठी व या उपक्रमामधील लोकसहभाग वाढीसाठी अनेक उपक्रम राबवले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *